शिवराज्याभिषेक 🚩
६ जून. सध्या वापरात नसलेल्या ज्युलियन कॅलेंडर नुसार शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस!
मी, जर एखादी ऐतिहासिक गोष्ट चूक असेल किंवा संदर्भहीन असेल तर भावना बाजूला ठेवून ती गोष्ट चूकच आहे या मतावर ठाम असणारा इतिहास वाचक आहे.
त्यामुळे बघायचं झालं तर ६ जून ही तारीख वापरात नसलेल्या ज्युलियन कॅलेंडर नुसार असल्यामुळे चुकीची आहे. खरा राज्याभिषेक दिन तारखेने काढायचा झाला तर ती तारीख सध्या वापरात असलेल्या ग्रेगोरियन कॅलेंडर १६ जुन येते. जी अचूक आहे. त्यामुळे खरंतर राज्याभिषेक तिथीने व १६ जून लाच साजरा व्हायला हवा.
पण, हिंदू जात म्हणजे मेलेली जात, पिढीजाद गुलामांची जात इथपासून सुरवात करून ज्यांनी म्लेंच्छ आणि स्वकियांच्या गुलामगिरीतून महाराष्ट्राला, मराठी माणसाला आणि हिंदूला बाहेर काढून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अशा शिवाजी महाराजांसमोर हे तारीख वगैरे विषय फारच फिके पडतात.
त्यामुळे तारखांच्या गोंधळात न पडता हा १० दिवसांचा काळच मी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काळ मानतो. याच काळात महाराज शिवाजीराजे छत्रपती झाले.
चार शाह्या उरावर भाले रोवून उभ्या असतानाही त्यांस पराभूत करून मराठा राजा छत्रपती झाला! ही सामान्य गोष्ट नव्हे!
महाराष्ट्र, जो आज अस्तित्वात आहे तो फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांमुळेच. मराठी माणसाला अखंड भारताच्या इतिहासात स्थान प्राप्त करता आलं ते फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांमुळेच. आदरणीय ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. गजानन मेहेंदळे यांनी म्हटल्या प्रमाणेच, जर इतिहासात शिवाजी महाराज नसते तर आज महाराष्ट्र पाकिस्तानचा भाग असता.
क्वचित प्रमाणात राहिलेला, सुंथा न करवून घेतलेला हिंदू अजूनही पिढीजात गुलामच राहिला असता.
या अशा सूर्याचे दिव्य तेज आपण सर्वांनीच सदैव चिंतावे. यासाठी कोणत्याही तारखेची अथवा तिथीची जरूर नाही असे माझे मत आहे.
"या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ पादशाह. मऱ्हाटा छत्रपति झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही."
- ओंकार ताम्हनकर

Comments
Post a Comment